अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या वेगवेगळ्या स्टाईलने ओळखली जाते. हुमा कुरेशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या फॅशन सेन्समुळे हुमा कुरेशी नेहमी चर्चेत असते. अलीकडेच हुमा कुरेशीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निळ्या रंगाची साडी परिधान केलेले फोटो हुमाने तिच्या इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. ऑफ शोल्ड ब्लाऊजसह हुमाने आपला साडी लूक पूर्ण केलाय. लांब कटाच्या साडीमध्ये आपला लूक आणखी स्टाईलिश बनवण्यासाठी हुमाने केस रिकामे सोडले आहेत. हुमाने ग्लोईंग मेकअप करून कानात स्टाईलिश रिंगा घातल्या आहेत. या साडी लूकमध्ये हुमा कुरेशी खूपच सुंदर दिसत आहे.