मराठी मालिका आणि नाटकातून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

हृताने आता 25 लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.

सर्वात जास्त फोलअर्स असलेली हृता ही मराठी मनोरंजनसृष्टीतली पहिलीच अभिनेत्री आहे.

हृता दुर्गुळे नुकतीच प्रतीक शाहसोबत लग्नबंधनात अडकली आहे.

हृता दुर्गुळेला महाराष्ट्राची क्रश असे म्हटले जाते.

फुलपाखरू मालिकेने हृताला ओळख मिळवून दिली.

सध्या हृता 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हृता दुर्गुळेच्या 'दादा एक गूड न्यूज आहे' या नाटकाचे सध्या रंगभूमीवर जोरदार प्रयोग होत आहेत.

हृताचा 'अनन्या' आणि 'टाईमपास 3' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हृता सध्या 'अनन्या'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.