छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ताचा प्रत्येक लूक लोकांना आवडला आहे टीना अनेकदा तिच्या प्रत्येक अवतारामुळे चर्चेत असते. आता पुन्हा तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोंमध्ये टीना इतकी बोल्ड दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे. टीना दत्ताने तिच्या 'उत्तरन' या सुपरहिट शोमध्ये इच्छा ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे. आजही ती प्रत्येक घरातील इच्छा नावाने ओळखली जाते. देशभरात तिचे लाखो चाहते आहेत. लोक तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. तिचा लेटेस्ट लुक पूर्ण करण्यासाठी टीनाने पिवळा ड्रेस परिधान केला आहे त्यासोबत हलका मेकअप केला आहे आणि केस बांधले आहेत. टीनाने मोठे कानातले घालून लूक ऍक्सेसरीझ केला आहे. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे