साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे चाहते जगभरात आहेत. समंथा ही नंबर वन रिसर्च अभिनेत्री बनली आहे. ओरमॅक्सने जारी केलेल्या या यादीनुसार, समंथाने आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांसारख्या बड्या बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे. काही काळापूर्वी सामंथा रुथ प्रभूने पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर समंथा अधिकच चर्चेत आली. साऊथची सुपरस्टार असलेली समंथा ही तिच्या अभिनयासोबत सौंदर्याबाबतही ओळखली जाते. समंथा सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. समंथाचं 'पुष्पा' या चित्रपटातील ऊ अंटावा गाणं हे प्रचंड गाजलं. समंथा लवकरच 'यशोदा' आणि 'शाकुंतलम' या चित्रपटात दिसून येणार आहे . समंथाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.