भिनेता हृतिक रोशन मोठ्या ब्रेकनंतर ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) अभिनित ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.



अ‍ॅक्शन पॅक्ड व्हिज्युअल्स आणि आशयघन कथानक असलेला 'विक्रम वेधा' या हिंदी चित्रपटाचा टीझर म्हणजे प्रेक्षकांसाठी एक आश्चर्याचा सुखद धक्काच आहे.



या चित्रपटात ‘वेधा’च्या भूमिकेत अभिनेता हृतिक रोशन झळकणार आहे



तर सैफ अली खान ‘विक्रम’ साकारत आहे.



चित्रपटाचा 1 मिनिट 46 सेकंदांचा टीझर 'विक्रम वेधा'च्या विश्वाची सफर घडवणारा आहे.



शिट्ट्या वाजवण्याजोगे संवाद, मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्शन सीक्वेन्स, आकर्षक पार्श्वसंगीत आणि भावूक करणाऱ्या नाट्याने हा टीझर परिपूर्ण आहे.



'विक्रम वेधा' हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे एक पूर्ण पॅकेज असल्याचे संकेत देणारा टीझर खूपच आकर्षक आहे.



30 सप्टेंबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना हा चित्रपट पहायला मिळणार आहे.



या चित्रपटाच्या टीझरला डिजिटल प्लॅटफॉर्मवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कौतुकाचा वर्षाव होत आहे.