वास्तूशास्त्रानुसारा , घरात पोपट असणे खूप शुभ मानले जाते.घरात पोपच असेल तर पैसा तुमच्याकडे टिकून राहतो. घरात एकटा पोपट कधी नसावा त्याच्या सोबतीला मैना असणे गरजेचे आहे.जर पोपट आणि मैना दोन्ही घरात असेल तर त्या घरातील पती-पत्नीचे संबंध चांगले राहतात. पोपट घरात ठेवताना तो पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवा. जेणेकरून घरात सुख-समृद्धी नांदते. पोपट घरात असेल तर घरात अकाली कोणाचाही मृत्यु होऊ शकत नाही. तुमच्या घरात मुले असतील तर तुम्ही नक्की पोपट पाळा. कारण यामुळे मुलांचे अभ्यासात लक्ष लागते आणि त्यांची एकाग्रता वाढते. घरात पाळलेल्या पोपटाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे नशीब देखील तुम्हाला साथ देईल. तुमच्या घरात सतत कोणी आजारी पडत असेल किंवा पैशाच्या काही समस्या सुरू असेल तर तुम्ही लवकरात लवकर घरात पोपट आणावा. पोपट घरात असल्याने सकारात्म ऊर्जा कायम घरात राहते. तुमच्या घरात कोणी व्यापार करत असेल आणि सतत नुकसान होत असेल तर मात्र घरात पोपट आणावा. पण एका गोष्टीची नेहमी काळजी घ्या की पोपट जर रागावला तर तो घराला शाप देऊ शकतो, याचा वाईट परिणाम घरातील सदस्यांवर होऊ शकतो.