घरात तुमच्यासाठी आणि मुलांसाठी एक छोटेखानी लायब्ररी निर्माण करा.

मुलांसमोर पालकांनी नियमित वाचन करा कारण पालक मुलांचे खरे आदर्श असतात.

मुलांच्या वाचनाच्या आवडीबाबत त्यांचे मनापासून कौतुक करा ज्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल.

मुलांच्या वयानुसार एखादे पुस्तक निवडून ते तुम्ही आणि मुलांनी मिळुन वाचा आणि त्यावर वैचारिक चर्चा करा.

अभ्यासा व्यतिरिक्त इतर पुस्तके वाचण्याच्या सवयीमुळे मुलांचा वैचारिक विकास होईल.

वाचलेल्या पस्तकांची नोंद आणि सारांश काढण्यासाठी मुलांना सांगा.

मुलांना एखादा विषय द्या आणि त्याविषयी माहिती त्यांना स्वतः गोळा करण्यास सांगा.

लहान मुलांना मोबाईलवर गेम खेळायला देण्यापेक्षा ई-बुक वाचण्याची सवय लावा.

एक ते पाच वयोगटातील मुलांना गोष्टींच्या पुस्तकांच्या माध्यमातून वाचन करण्याची सवय लावा.

१०

लहानपणीच मुलांना गोष्टी, कथा, चरित्र सांगून मुलांच्या मनात पुस्तकांबाबत कुतूहल निर्माण करा.