Blackheads Remedy : ब्लॅकहेड्सपासून सुटका हवी असेल, तर हे घरगुती उपाय करुन पाहा.
काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही ब्लॅकहेड्स हटवू शकता.
चेहऱ्यावर केमिकल प्रोडक्ट्सचा वापर कमी करा. जास्त प्रोडक्ट्स वापरल्याने चेहऱ्यावरील पोर्स बंद होतात आणि ब्लॅकहेड्सची समस्या उद्भवते.
पहाटे उठल्यावर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे रक्ताभिसरण वाढेल.
ब्लॅकहेड्सवर टुथपेस्ट लावा आणि दोन मिनिटे ठेवा.
त्यानंतर कापूस किंवा साफ कपड्याने टुथपेस्ट पुसून टाका आणि चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि कोमट पाण्याचे काही थेंब टाका.
हे मिश्रण चेहऱ्यावर लावून स्क्रब करा. काही मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
नारळाच्या तेलामध्ये जोजोबा ऑईल आणि साखरेचे काही दाणे मिसळून चेहऱ्यावर स्क्रब करा. स्वच्छ कपड्याने चेहरा साफ करा.
दालचिनी पावडरमध्ये एक चिमटी हळद आणि लिंबाचे काही थेंब मिसळून हे मिश्रण ब्लॅकहेड्सवर लावा. 5 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
अर्धा कप लिंबाच्या रसामध्ये दही आणि ओटमील पावडर मिसळा. या पेस्टने चेहऱ्यावर स्क्रब करा आणि कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.