रिठा , आवळा आणि शिकेकाई हे तीन घटक शॅम्पूकरता आवश्यक आहेत. या शॅम्पू करता रिठा, शिकेकाई , आवळा , मेथीचे दाणे सगळे एकत्र करावे. हे सर्व रात्रभर पाण्यात भिजत ठेवावेत आणि नंतर याला बारिक करावे. त्यानंतर यात कडुनिंब आणि जास्वंदाची पानं घालून मिश्रण उकळून घ्यावे. उकळून झाल्यावर गाळून घ्यावे. हा शॅम्पू तयार होताना गाळलेले पदार्थ वाटून त्यात घालावेत. हा शॅम्पू महिनाभर वापरण्यासाठी योग्य ठरेल. अंघोळीच्या आधी शॅम्पूने केसांना मालिश करावी. अंघोळ करताना गरम पाण्याचा वापर करणं टाळावं. इतर शॅम्पूसारखा याला फेस येणार नाही पण केस स्वच्छ धुतले जातील.