सुंदर दिसण्यासाठी बाजारातील विविध प्रोडक्ट्स वापरण्याऐवजी सोपी उपाय करुन पाहा. सुंदर त्वचेसाठी तुम्ही 'राईस वॉटर' वापरून पाहा. राईस वॉटर म्हणजेच तांदळाच्या पाण्यामुळे तुमच्या त्वचेवर छान ग्लो येईल. तांदळामधील असणाने अँटी-एजिंग आणि अँटीऑक्सिडेंट्स त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. राईस वॉटर त्वचेचा पोत सुधारण्यास आणि डाग-मुक्त करण्यास मदत करतो. राईस वॉटर तयार करण्यासाठी एक कप तांदूळ घ्या. हे तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यानंतर एका भांड्यात तांदूळ घेऊन त्यामध्ये तीन कप पाणी ओता. आता हे तांदूळ किमान अर्धा ते एक तास भिजू द्या. यानंतर पाणी गाळून घ्या. चेहरा धुवून त्यावर कापसाच्या गोळ्याने राईस वॉटर लावा. 15 ते 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. तुम्ही हे राईस वॉटर फ्रिजमध्ये ठेवून आठवडाभर वापरू शकता. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.