1

गुलाबाची पावडर बनवण्यासाठी प्रथम वाळलेल्या गुलाबाची फुले घ्या.

2

जर ताजी फुले असतील तर तेही तुम्ही वापरु शकता.

3

यासाठी गुलाबाच्या पाकळ्या वेगळ्या करुन स्वच्छ पाण्याने धुवाव्यात.

4

नंतर गुलाबाच्या पाकळ्या कोरड्या करण्यासाठी ठेवा.

5

4-5 दिवसांनी सर्व पाकळ्या कोरड्या होतील.

6

आता वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करुन पावडर तयार करा.

चेहऱ्यावर चमक आणण्याकरता तुम्ही गुलाब पावडरचा स्क्रब म्हणून वापर करू शकता.

यासाठी गुलाब पावडरमध्ये साखर मिसळून स्क्रब बनवा.

गुलाब पावडरच्या मदतीने तुम्ही त्वचेला क्षणार्धात ताजेतवाने करू शकता.

यामुळे तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या चमकेल.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.