बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) असे या सिनेमाचे नाव आहे.

हा सिनेमा ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

साजिद नाडियाडवाला हे या सिनेमाचे निर्माते आहेत.

सलमान खानसह या सिनेमात पूजा हेगडेदेखील मुख्य भूमिकेत आहे.

सलमान ईदच्या दिवशी सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ करणार आहे.

प्रेक्षक आता 'कभी ईद कभी दिवाली' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.