शाहरूख खान याने गौरीवर प्रेम केलं होतं. लग्नासाठी धर्माची भींत आडवी येणार हे सुद्धा दोघांना माहित होतं. शाहरूख आणि गौरीची पहिली भेट मित्राच्या पार्टीमध्ये झाली होती. शाहरूखने गौरीला पार्टीत पहिल्यांदा पाहिले होते. त्यावेळी ती मित्रासोबत डान्स करत होती. एक दिवस शाहरूखने धाडस करून गौरीला आपल्या प्रेमाबद्दल सांगितले आणि येथूच दोघांची प्रेम कहाणी सुरू झाली. थोड्या वर्षाच्या मैत्रीनंतर शाहरूख आणि गौरीने लग्नाबद्दल आपापल्या घरी सांगितले. त्यांच्या प्रेमात धर्माची भींत आडवी आली. त्या वेळी शाहरूख स्ट्रगल करत होता. शाहरुख आणि गौरीचे लग्न 1991 मध्ये झाले.