स्वयंपाकघरातील वाया जाणाऱ्या पदार्थांपासून खत बनवले जाऊ शकते.

तुम्ही भाज्या आणि फळांच्या सालींपासून हे खत बनवू शकता.

या खताचा वापर तुम्ही झाडांसाठी करू शकता.

हे खत बनवण्यासाठी या टिप्सचा वापर करा.

भाजी आणि फळांची सालं एकत्र करून घ्या.

भाजी आणि फळांची सालं उन्हात वाळवून घ्या त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या.

तुमच्या घराच्या परिसरात एक 14 इंचाचा खड्डा करून घ्या.

या व्यतिरिक्त तुम्ही एका मोठ्या डब्यातही कचरा ठेवू शकता.

त्या डब्याला छिद्र करून घ्या आणि त्यात लाकडाचे छोटे छोटे तुकडे टाका.

या डब्यात अथवा खड्ड्यात कचरा टाकून ते झाकून ठेवा. यामुळे ओलसरपणा टिकून राहतो.