१५ मिनिटे लिंबाच्या रसात पितळेचे भांडे ठेवा आणि मग स्वच्छ धुवा.

उकळलेल्या पाण्यात वॉशिंग पावडर आणि हळद घाला त्या मिश्रणात पितळेची भांडी थोडा वेळ भिजत ठेवा आणि मग कालांतराने धुऊन टाका.

चिंच १ कप पाण्यात भिजवत ठेवा आणि त्या चिंचेने भांडी चांगली धुवा.

पितळेच्या भांड्यावरील काळपटपणा दूर करायचा असेल तर पितळेच्या भांड्यासाठी तयार केलेल्या पॉलिशने ते नियमितपणे पॉलिश करा.

पितळेची भांडी स्वच्छ आणि पॉलिश करण्यासाठी तुम्ही ब्रास क्लीनर वापरू शकता.

पितळेच्या भांड्यांवर टूथपेस्ट लावा आणि कमीतकमी 1 तासानंतर कोमट पाण्याने भांडी स्वच्छ करा.

मैदा, मीठ आणि व्हिनेगर घालून पेस्ट बनवा, ही पेस्ट ४५ मिनिटे भांड्यांवर लावून ठेवा मग भांडी कोमट पाण्याने धुवा.

अर्ध्या लिंबाच्या रसात एक चमचा बेकिंग सोडा मिसळा त्याची पेस्ट भांड्या‌वर लावून ३०-४० मिनिटे ठेवा मग भांडी धुवा.

पितांबरी पावडरने पितळेची भांडी स्वच्छ करता येतात.

कोकमाच्या रसाने पितळेची भांडी स्वच्छ करता येतात.