डेबिट कार्डमुळे बँकेत न जाता तुम्हाला सहज पैसे काढता येतात. पण अनेकदा तुमचं डेबिट कार्ड चोरी होतं किंवा हरवतं. अशा स्थितीमध्ये तुम्ही तुमचं डेबिट कार्ड हे लगेचच ब्लॉक करायला हवं. त्यामुळे याचा कोणी दुरुपयोग करणार नाही. डेबिट कार्ड ब्लॉक करणं हे आता खूप सोपं झालं आहे. तुम्ही नेट बँकिंग किंवा एसएमएसच्या माध्यमातून देखील डेबिट कार्ड ब्लॉक करु शकता. पण त्याचासाठी तुमचा फोन नंबर हा रजिस्टर असायला हवा. याशिवाय प्रत्येक बँकेचे ऑनलाईन पोर्टल देखील असते. त्यावरुन देखील तुम्ही तुमचं डेबिट कार्ड ब्लॉक करु शकता.