अनेकदा आपण केसांची कितीही काळजी घेतली तरीही इतर कोणाच्यातरी संपर्कात आल्याने केसांत उवा होतात. अशा वेळी घाबरून जाण्याऐवीजी तुम्ही काही घरगुती उपाय केले तर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.
व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही उवांच्या समस्येला कायमचा निरोप देऊ शकता. यासाठी केसांना व्हिनेगर लावा आणि काही वेळाने केस स्वच्छ पाण्याने धुवा.
टी ट्री ऑइल हे अँटी-मायक्रोबियल घटकांचा उत्तम स्रोत मानला जातो. यासाठी आठवड्यातून तीन वेळा केसांना टी ट्री ऑइल लावा. यामुळे केसांमधील उवांची समस्या पूर्णपणे दूर होईल.
रात्री झोपण्यापूर्वी केसांना पेट्रोलियम जेली लावा आणि टॉवेलने केस झाकून ठेवा. आता सकाळी उठल्यानंतर केसांना बेबी ऑईल लावून कंगवा करा. यामुळे केसांतील सर्व उवा निघून जातील.
8-10 लसूण पाकळ्या बारीक करून पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये लिंबाचा रस घालून केसांना लावा आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने केस धुवा.
कांद्याचा रस लावून केसातील उवांपासूनही सुटका मिळते. यासाठी कांद्याचा रस काढून केसांना लावा आणि 3-4 तासांनी केस शॅम्पूने धुवा.
एक कप कडुलिंबाची पाने उकळून त्याची पेस्ट बनवा. हे केसांना लावा आणि 2 तास सोडा, त्यानंतर ते कोमट पाण्याने चांगले धुवा.
3 चमचे व्हिनेगर एक कप मीठ घालून पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट केसांवर लावा आणि शॉवर कॅप किंवा प्लास्टिक फॉइलने केस झाकून टाका. 2 तासानंतर धुवून टाका.
अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि एक कप दही दोन चमचे लिंबाचा रस मिसळा आणि 20 मिनिटे डोक्याला लावून धुवा.
पेरूची पाने बारीक करून त्यात हळद मिसळा आणि आंघोळीच्या दोन तास आधी डोक्याला नीट लावा. यामुळे उवा दूर होतील.