सर्वात आधी पंखा बंद करा आणि त्याचा विद्युत पूरवठा खंडित करा.
प्लगपासून तुम्ही जर पंखा डिस्कनेक्ट केला नाही तर स्वच्छ करताना तुम्हाला शॉक लागण्याची शक्यता असते.
बऱ्याचदा पंख्यावर एक झाकण बसवलेले असते. स्वच्छ करण्यासाठी ते झाकण काढून पंख्याची पाती स्वच्छ करा.
सर्वात जास्त चिकटपणा हा पंखाच्या पात्यांवर बसलेला असतो.
गरम पाणी, व्हिनेगर, बेकिंग सोडा, सौम्य साबण अशा गोष्टी तुम्ही पंख्याची पाती स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता.
पंखाच्या पात्यांवर एखाद्या स्क्रबरने हळूवार घासून चिकटपणा दूर करा.
चिकटपणा जास्त असेल तर लिंबांचा वापरही तुम्ही स्वच्छतेसाठी करू शकता.
शक्य असल्यास पंख्याची पाती काढून ती कोमट पाणी आणि साबणाने स्वच्छ करा.
धुतलेली पंख्याची पाती सर्वात आधी सुकवा आणि मगच पुन्हा पंख्याला जोडा.
पंखा स्वच्छ केल्यावर तो सुकू दया, मगच विद्युत पूरवठा सुरू करा.