मुंबईमध्ये इसवी सन 1600 च्या दरम्यान जवळपास तुर्की सीरिया एवढाच सात रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद आहे.
नंतर ही छोटे मोठे भूकंपाचे धक्के मुंबई आणि ठाण्याच्या विविध भागात जाणवले आहेत.
भूकंपाच्या दृष्टिकोनातून मुंबई आणि आसपासचा परिसर सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे
मुंबई हे भूकंपाच्या दृष्टीने भूकंपाच्या नकाशावर झोन 3 मध्ये येते.
याचा अर्थ मध्यम-जोखीम क्षेत्र म्हणून वर्गीकृत असूनही लोकसंख्येच्या उच्च घनतेमुळे हानी आणि जीवितहानीसाठी अत्यंत संवेदनशील मानले जाते.
पृथ्वीच्या कवचातून पनवेलपासून उत्तरेकडे कोपरखैरणे आणि भिवंडीमध्ये सक्रिय फॉल्ट लाइन आहेत
मुंबई आणि आसपासच्या परिसरात असे एकूण 31 फॉल्ट लाइन आहेत.
शिवाजी नगर, गोवंडी, घाटकोपर, भांडुप, विद्याविहार आणि मुलुंड यांसारख्या काही भागात भूकंपाचा धोका अधिक जाणवू शकतो
शिवाय ठाणे खाडीलगतचा भाग आणि नवी मुंबईतील काही भागाचा सुद्धा यामध्ये समावेश आहे.
मुंबई आयआयटीने 2008 पासून मुंबईची भूकंपस्थिती आणि घ्यावयाची विशेष खबरदारी या संदर्भात अभ्यास केला आहे.