मुंबईत चकाला बेस्ट थांब्यावर बर्निंग बसचा थरार दिसला चकाला परिसरामध्ये दुपारी 3:15 च्या सुमारास बेस्ट बसला मोठी आग लागली अंधेरी आगरकर चौकातून साकीनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या बेस्ट च्या ४१५ क्रमांकाच्या बसला सर मथुरादास मार्गावर चकाला या बेस्ट बस थांब्याजवळ मोठी आग लागली बस मध्ये 50 ते 60 प्रवासी प्रवास करत असताना चालत्या बस मध्ये ही मोठी आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सुदैवाने या आगीमध्ये सर्व प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात वाहतूक पोलिसांना यश आलेलं आहे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत बेस्टची बस जळून संपूर्णपणे खाक झाली आहे बसला आग लागतच प्रवाशांनी बस मधून उडी मारून आपला जीव वाचवला आहे गेल्या काही महिन्यांपासून मुंबईमध्ये बेस्टच्या बसला आग लागल्याचा घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे