आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा उद्यापासून सातवा टप्पा
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आता सुरु होत असून
6 जानेवारी म्हणजेच उद्यापासून यात्रेला सुरुवात होत आहे.
एकूण चार दिवसांची ही शिवसंवाद यात्रा असणार असून
नाशिक, औरंगाबाद, जालना व बीड जिल्हयातून जाणार आहे
विशेष म्हणजे यापूर्वी देखील आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढत
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले होते
तर आता याच यात्रेचा हा सातवा टप्पा असणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या चार दिवसांच्या शिवसंवाद यात्रेत ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील सहभागी असणार आहे
आदित्य ठाकरेंच्या चार दिवसांच्या दौऱ्यात दानवे देखील चार दिवस उपस्थित राहणार आहे.