चांगल्या आरोग्यासाठी पोषण तत्त्वे असणाऱ्या गोष्टी खाणं किंवा पिणं फायदेशीर ठरु शकतं. त्यामुळे नेहमी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूध हे चवीला देखील उत्तम असते आणि त्यामुळे आरोग्य देखील चांगलं राहण्यास मदत होते. पण जर दूधामध्ये तूप घालून दूध प्यायले तर त्याचे दुप्पट फायदे मिळण्यास मदत होते. दूध आणि तुपामुळे शरीराला अनेक फायदे मिळण्यास मदत होते. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास फायदा होऊ शकतो. रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सांधेदुखीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते. ताकद वाढवण्यास दूध फायदेशीर ठरते.