Salt : तुम्ही जर आहारात मिठाचा अतिरिक्त वापर करत असाल, तर सावधान. कारण अतिरिक्त मिठामुळे तुमच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात. हल्ली अनेकांना उच्चरक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. मात्र त्याचं कारणच मीठ असल्याचं तज्ज्ञ सांगतात. मिठाच्या अधिकच्या वापराने उच्चरक्तदाब होतोच, शिवाय त्यामुळे हृदयरोगाचं प्रमाणही वाढलं आहे. तज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारातून केवळ 5 ते 6 ग्रॅम मीठ शरीरात जाणं आवश्यक आहे. मात्र सध्या यापेक्षा दुप्पट-तिप्पट प्रमाणात मीठ शरीरात जात असल्याचं समोर आलं आहे. शहरी भागात 30 ते 40 टक्के तर ग्रामीण भागात 12 ते 17 टक्के रुग्णांना उच्च रक्तदाबाची समस्या जाणवत आहे. उच्चरक्तदाबाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू, स्मृतीभ्रंश, दृष्टी जाण्याची भीती अशा समस्या उद्भवू शकतात.