मागील काही दिवसांपासून भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. कधी टोमॅटो तर कधी कांद्याचे भाव वाढतात. आज अमेरिकेत कांद्याचे किती भाव आहेत, हे जाणून घेऊयात. भारतापेक्षा कित्येक पटीने जास्त अमेरिकेत कांद्याचे भाव आहेत. सध्या अमेरिकेत कांदा हा 240 ते 250 रुपयांपर्यंत विकला जातो. अहवालानुसार, युरोपमध्येही कांद्याचा तुटवडा आहे. अमेरिकेत पीक कमी असल्यामुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली आहे. अमेरिकेतील मुख्य शहरात देखील कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. न्यूयॉर्कमध्ये कांद्याचे दर 240 रुपये, लॉस एंजलिसमध्ये 250 रुपये. शिकागो - 230, हास्टन 220 रुपये