जगभरातील अनेक लोकांना प्रवास करायला आवडते. उत्तम वाहन चालवणे ही अनेकांची चांगली सवय असते. वाहतुकीच्या नियमांचे पालन करून उत्तम वाहन चालवले जाते. राइडिंग विथ इंटरसिटीने आपला प्रवास अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात 50 हुन अधिक देशांचा समावेश करण्यात आला आहे. या अहवालानुसार सर्वात उत्तम चालक जपान मध्ये असल्याचे सांगितले जाते. नेदरलँडचा उत्तम वाहन चालक म्हणून दुसरा क्रमांक लागतो. या यादीत तिसरा क्रमांक नॉर्वेचा लागतो. तर एस्टोनिया या देशाचा उत्तमच चालक वाहन म्हणून चौथा क्रमांक लागतो. उत्तम वाहन चालक म्हणून पाचवा क्रमांक स्वीडन या देशाचा लागतो.