घरात, अंगणात तुळशीचे झाड लावणे पवित्र मानले जाते. तुळशी हिंदू धर्मातील पवित्र झाड म्हणून ओळखले जाते. तुळशीची नियमित पूजा केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. वास्तुशास्त्ररानुसार ज्या घरात तुळशीचे झाड असते तेथे साकारत्मकता टिकून राहते. तुळशीला काही गोष्टी अर्पण केल्याने अनेक लाभ मिळतात. तसेच तुमच्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या गोत्राचे नाव घेत सात वेळा उसाचा रस तुळशीला अर्पण करावा. एकादशी, रविवार आणि ग्रहण सोडून दररोज तुळशीला पाणी अर्पण करावे. तुळशीला पाणी अर्पण केल्याने घरात सुख, शांती नांदत असल्याचे सांगितले जाते. गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण केल्यास गुरुची दृष्टी तुमच्यामर कायम राहू शकते.