6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याने नेपाळमध्ये मृत्यूतांडव पाहायला मिळाला.

पश्चिम नेपाळमध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे.

नेपाळ गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,

जाजरकोट आणि रुकुम पश्चिममध्ये आतापर्यंत 157 लोकांचा मृत्यू झाला आहे

आणि सुमारे 200 लोक जखमी झाले आहेत.

ते म्हणाले की, भूकंपामुळे जाजरकोट जिल्ह्यातील 1,800 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत,

तर रुकुम पश्चिममध्ये 2,500 घरे उद्ध्वस्त झाली आहेत

अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूकंपग्रस्त भागातील बेघर लोकांना तंबू, ब्लँकेट आणि अन्नपदार्थांची नितांत गरज आहे.

तर, जाजरकोट जिल्ह्यातील बरेकोट ग्रामीण नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणाले की

भूकंपामुळे त्यांच्या भागातील 80 टक्के घरांचे नुकसान झाले आहे.