हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाकडे अवघा देश डोळे लावून बसलाय

आधीच तीन सामने टीम इंडियानं हार्दिकशिवाय खेळलेत



अशातच हार्दिक पांड्या आता विश्वचषकातूनच बाहेर गेलाय



हार्दिकला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापत झालेली

दुखापतीमुळेच हार्दिक विश्वचषकातून बाहेर गेलाय

हार्दिकऐवजी विश्वचषकात आता टीम इंडियात प्रसिद्ध कृष्णाची वर्णी लागलीये

प्रसिद्ध कृष्णाची संघातील निवडही आश्चर्यकारकच

हार्दिकऐवजी अष्टपैलू खेळाडूचीच वर्णी लागेल, अशी साऱ्यांनाच अपेक्षा होती

मात्र, प्रसिद्ध कृष्णाच्या निवडीमुळे सारेच आश्चर्यचकीत झालेत

प्रसिद्ध कृष्णानं टीम इंडियाकडून 17 वनडे खेळलेत, तर 29 विकेट्स घेतल्यात

कृष्णानं दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळलेत

तरिही टीम इंडियाला हुकुमी एक्क्याशिवाय सेमीफायनल्सचं शिवधनुष्य पेलणं अवघडच जाणार आहे.