मुसळधार पावसामुळे उत्तर भारतात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे विविध भागात भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे विविध भागात भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पाण्याच्या जोरदार प्रवाहात रस्ते आणि पूलही वाहून गेले.

ब्यास नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे मंडी जिल्ह्यातील नागवाईन गावाजवळ सहा जण अडकले होते.

मुसळधार पावसामुळे ब्यास नदीत पंचवक्त्र मंदिर बुडालं आहे.

तसंच पावसामुळे रविवारी पंचवक्त्र पूल कोसळला.

अनेक वाहनं पुरात अडकली असून काही वाहने जोरदार प्रवाहात वाहून गेली आहेत.

हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.