सकाळी उठल्यावर लसणीच्या पाकळ्या मनुक्यासोबत खाल्ल्याने जंत मलासोबत निघून जातात.

तसेच लसणीच्या पाकळ्या चावून खाल्ल्याने जंतांमुळे होणाऱ्या पोटदुखीवर आराम पडतो.

डाळिंबाच्या सालींचा काढा देखील जंतांवर परिणामकारक ठरतो.

डाळिंबाची साल सुकवून त्याची पूड करुन कोमट पाण्यातून घालून त्याचा काढा करावा.

हा काढा दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास पोटातील जंत निघून जातील.

जंतांवर नारळ उपयुक्त ठरतो. खवलेलं खोबर सकाळी खाऊन त्यावर एरंडेल तेल प्यावं यामुळे पोट साफ होईल.

वावडिंगाचं चूर्ण, हळद, मध एकत्र करुन चाटण करावं, दिवसातून तीन वेळा घेतल्यास जंत मरुन जातात.

पुदिन्याची पानं वाटून त्यात सुंठ, मिरी, वावडिंगाचं चूर्ण, ओवा, सैंधव मीठ घालून चटणी करावी.

रोज सकाळी टोमॅटो कापून काळमिरीचं चूर्ण, हिंग, सैंधव मीठ घालून खाल्ल्याने जंत पूर्णपणे निघून जातील.

जंतावर पुदिन्याचा रस, गाजराचा रस, कडुनिंबाचा रस, पपईच्या बिया, भोपळ्याच्या बिया परिणामकारक ठरतात.