दिवसभरात दोनवेळा 1 ग्लास कोमट पाण्यात मध आणि लिंबू रस मिसळावा, हे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

१ चमचा मध, ढूळश्याचा रस, अर्धा चमचा आल्याचा रस एकत्र करावा. या मिश्रणाचं सेवन केल्याने खोकला बरा होण्यास मदत होते.

शुद्ध मध ओळखण्यासाठी मधात कापसाची वात पेटवावी. बात न तडतडता पेटल्यास ते मध शुद्ध आहे असं समजावं.

मधाचं उटणं तयार करण्यासाठी मध आणि मैदा एकत्र करावं त्यात थोडं गुलाब पाणी घालावं. साबणाऐवजी या उटण्याचा वापर करावा.

सकाळी मध मिसळून कोमट पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.

ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी सकाळी मध आणि कोमट पाण्याने सुरुवात करावी, यामुळे अपचनपासून आराम मिळू शकतो.

मधामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आढळतात, जे अनेक आजारांपासून तुमचे संरक्षण करतात. तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

मधामुळे शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.

पिंपल्स दूर करण्यासाठी मध उपयोगी आहे. गुलाब पाणी, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास त्याचा फायदा होतो.

रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात.