आपल्या शरीराचे सर्व अवयव महत्वाचे आहेत. शरीराच्या प्रत्येक अवयवाची विशेष काळजी घ्यावी लागते.



त्याचप्रमाणे डोळ्यांचे संरक्षणही महत्त्वाचे आहे.



डोळ्यांची छोटीशी समस्या उद्भवली तरी सावध राहिले पाहिजे.



झोप न लागणे, डोळ्यांमध्ये जळजळ होणे किंवा डोळ्यांवर जास्त ताण येणे अशा अनेक कारणांमुळे डोळ्यांना सूज येणे आणि डोळे लाल होणे हे होऊ शकते.



आराम मिळण्यासाठी अनेक प्रकारचे डोळ्याचे थेंब उपलब्ध आहेत. पण कायमस्वरूपी उपचारासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता, ज्यामुळे तुम्हाला खूप आराम मिळू शकतो.



जर तुमचे डोळे सुजलेले आणि लाल झाले असतील तर कोल्ड कॉम्प्रेस तुम्हाला आराम देऊ शकते. यासाठी थंड पाण्यात स्वच्छ कापड भिजवा.



त्यानंतर टॉवेलमध्ये बर्फाचा तुकडा गुंडाळा आणि डोळ्यांवर हळूवारपणे दाबा. काही वेळ असेच डोळे बंद ठेवा. शीतलता देऊन तुम्हाला खूप आराम मिळेल.



तुम्ही अनेकदा पार्लरमध्ये पाहिलं असेल की, चेहऱ्याचा मसाज केल्यानंतर काकडीचे तुकडे डोळ्यांवर लावले जातात.



त्यामुळे डोळ्यांची जळजळ आणि सूज कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही हे घरीही करू शकता. फक्त काकडीचे काप डोळ्यांवर लावा. 15 ते 20 मिनिटे डोळ्यांवर थंड काकडी लावा.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.