अंजीर हे मध्य पूर्व आणि पश्चिम आशियातील एक गोड आणि रसाळ फळ आहे. हे एक प्रकारचे फळ आहे जे तुम्ही ताजे, सुकलेले किंवा शिजवलेले सुद्धा खाऊ शकता. अंजीरमध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात. अंजीर डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी देखील उपयोगी फळ आहे. पचन, हृदयविकार, हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी अंजीर खाण्याचे अनेक फायदे आहेत. बद्धकोष्ठता दूर करण्याबरोबरच अंजीर आतड्यांसाठीही खूप चांगले आहे. अंजीर अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. हे पचनासाठी तसेच त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.