नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. आधी नाताळ आणि नंतर नवीन वर्षाचा उत्साह आणि जल्लोष सर्वत्र पाहायला मिळत आहे.
सर्वजण न्यू इअर सेलिब्रेशनसाठी वेगवेगळे प्लॅन करताना दिसत आहेत. पण या उत्साहाच्या वातावरणात तुमची छोटीशी चूक तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही दिवसांमध्ये ह्रदयविकारामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे.
सध्या सुट्ट्यांचा सीझन सुरु आहे. या काळात हार्ट अटॅकचा धोका असतो. या काळात हॉलिडे हार्ट सिंड्रोम नावाच्या आजाराचा धोका अधिक असतो.
हॉलिडे हार्ट सिंड्रोममुळे दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो.
हॉलिडे हार्ट सिंड्रोम म्हणजे उत्सवाच्या काळात खाण्या-पिण्याकडे केलेले दुर्लक्ष.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बहुतेक लोक लांब सुट्ट्या किंवा उत्सवावेळी आहाराकडे दुर्लक्ष करतात.
बहुतेक लोक या वेळी तेलकट, मीठयुक्त, साखरयुक्त पदार्थांचे सेवन अधिक करतात.
तसेच दारुचे म्हणजे अल्कोहोलचे सेवनही मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे अचानक ह्रदयावर ताण पडतो आणि त्यांचे कार्य मंदावते.
या परिस्थितीमध्ये ह्रदयविकाराची झटका येण्याची शक्यता जास्त असते.
हृदयविकाराची समस्या वर्षाच्या कोणत्याही वेळी उद्भवू शकते, पण हॉलिडे हार्ट सिंड्रोम ही समस्या सहसा सुट्टीच्या काळात उद्भवते.
सुट्ट्यांच्या काळात लोकांमध्ये तेलकट, तिखट म्हणजेच जास्त कॅलरीच्या आहाराचे सेवन आणि अल्कोहोलयुक्त पेये यांचे सेवन यामध्ये लक्षणीय वाढ होते.
यामुळे हृदयाचे ठोके वाढण्याचा त्रास जाणवू शकतो.
याची वेळीच काळजी न घेतल्यास हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचा धोका असतो.