कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या BF.7 सबव्हेरियंटचा संसर्ग जगभरात वेगाने होताना दिसत आहे.



दरम्यान, विशिष्ट रक्तगट असणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी किंवा जास्त असे संशोधनात समोर आले आहे.



चीन, जपान आणि ब्राझीलसह इतर देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. यामुळे जगाची चिंता वाढली आहे.



BF.7 संक्रमित रुग्णांमध्ये गंभीर लक्षण दिसण्याचे प्रमाण जास्त नाही, पण रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांसाठी हा विषाणू जीवघेणा ठरत आहे.



एका अहवालानुसार, विशिष्ट रक्तगट असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त असू शकतो.



दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलने एका संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.



यामध्ये तीन रक्तगट असलेल्या लोकांना कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.



तसेच काही रक्तगटाच्या लोकांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका कमी असतो, असेही म्हटले आहे.



सर गंगाराम रुग्णालयाच्या संशोधनानुसार, A रक्तगट, B रक्तगट आणि Rh पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त असतो.



संशोधनानुसार, A रक्तगट असलेल्या लोकांना कोरोनाचा संसर्गाचे प्रमाण 29.93 टक्के होते.



B रक्तगट असलेल्या लोकांना कोरोना होण्याचा धोका 41.8 टक्के तर, O रक्तगट असलेल्यांना 21.19 टक्के होता.



यासोबतच AB रक्तगट असलेल्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण 7.89 होते.