सध्या थंडीमध्ये सर्वाधिक मागणी असणारं फळ म्हणजे स्ट्रॉबेरी दिसायला लाल रसरशीत स्ट्रॉबेरी तितकीच फायदेशीर आहे. विशेष म्हणजे या फळापासून विविध पदार्थ बनतात आईस्क्रीम, केक, मिल्कशेक असे विविध पदार्थ स्ट्रॉबेरीपासून तयार होतात. स्ट्रॉबेरीमध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते. त्याशिवाय पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांसाठी त्या फायदेशीर आहेत. स्ट्रॉबेरीत असणारे अँटीऑक्सीडेंट, फ्लेवोनॉइड, फोलेट आणि केंफेरॉल ही तत्व कॅन्सर होण्यास कारणीभूत असणाऱ्या पेशी नष्ट करतात. स्ट्रॉबेरीपासून बनणाऱ्या विविध पदार्थांना भरपूर मागणी असते स्ट्रॉबेरी खाल्ल्याने त्वचा तजेलदार होते, तसेच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही कमी होतात. स्ट्रॉबेरीमधील ‘फोलेट’ हे तत्व तांबड्या रक्तपेशींची वाढ करण्यास मदत करतात. स्ट्रॉबेरीमुळे वजनावर नियंत्रण मिळवण्यास फायदा होतो.