हिवाळ्यातील कोरडी हवा आणि कमी झालेले आर्द्रतेचे प्रमाण यामुळे केसांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो हिवाळ्यातील केसांसंबंधी समस्या टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया आठवड्यातून एक किंवा दोनदा केसांना आणि टाळूवर थोडेसे कोमट तेल मसाज केल्याने केसांच्या मुळांचे पोषण होण्यास मदत होईल. जास्त वेळा केस धुण्याचा मोह टाळावा. आठवड्यातून जास्तीत जास्त दोनदा केस धुणे योग्य राहिल शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर कधीही वगळू नका. कंडिशनर केसांच्या मुळांना न लावता खालच्या दिशेने केसांच्या टोकापर्यंत लावा. हिवाळ्यात केस सुकवणे हे एक मोठे काम आहे. परंतु ओल्या केसांनी हवेत बाहेर पडणे अधिक नुकसानकारक ठरेल. थंडीच्या दिवसात केस कमकुवत होतात आणि अशा कमकुवत केसांवर हिवाळ्यात केसांना ब्लो ड्रायरचा वापर करु नका. कोरडी हवा केसांना शुष्क बनवतात. टाळूवरील ताण कमी करण्यासाठी केस खालच्या दिशेने विंचरा. केस निरोगी ठेवण्यासाठी तुमचा आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. योग्य आहाराचे सेवन करा