सनातन हिंदू धर्मात लग्न हे 4 महत्वपूर्ण संस्कारापैकी एक आहे.

हिंदू विवाह पद्धतीमध्ये अनेक रूढी परंपरा बघायला मिळतात.

ज्यामध्ये काही लग्नापूर्वी, काही लग्नात, तर काही लग्न झाल्या नंतर केल्या जातात.

त्यातीलंच एक म्हणजे नववधू गृहप्रवेश करतांनाची एक पद्धत आहे.

नववधू पहिल्यांदा संसारी जाते त्यावेळी गृहप्रवेश करतांना तांदूळ भरलेला कळस पाडून गृहप्रवेश केला जातो.

मात्र त्यामागे नेमके काय कारण आहे, हे तुम्हाला माहिती आहे का ?

हिंदू धर्मात तंदुळाचा वापर पूजा विधीमध्ये केला जातो. तांदळाला स्थिरतेचे प्रतीक मानल्या जाते.

तसेच घरी आलेल्या नववधूला घरातील लक्ष्मी मानल्या जाते.

घरात कायम सुख-समृद्धी, धन-संपदा असावी यासाठी ही पद्धत केली जाते.

ज्यावेळी नववधू आपल्या पायानी हा कळस पडते आणि त्यातील तांदळाचे दाणे सर्वत्र पसरतात त्याच प्रमाणे घरात सर्वत्र सुख समृद्धी पसरते अशी मान्यता आहे.

ही माहिती फक्त मान्यता, धर्मग्रंथ आणि विविध माध्यमावर आधारित आहे. हे मानण्यापूर्वी जाणकारचे मत घ्यावे.