देशात सध्या वेगवेगळ्या महामार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत.

आपल्या राज्यातही विविध महामार्गाची कामे सध्या सुरू असून या महामार्गाची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत.

जलदगती वाहतुकीसाठी एक्सप्रेस वे म्हणजे द्रुतगती मार्ग बांधले जातात.

एक्सप्रेस वे
एक्सप्रेस वे वर टू व्हीलर तसेच कमी गतीच्या वाहनांना परवानगी नसते.

एक्स्प्रेस वे साठी स्वतंत्र एन्ट्री पॉईंट आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र रॅम्प बनवले जातात.

एक्सप्रेस वे वर प्रवेश करण्यासाठी स्वातंत्र इंट्री आणि एक्झिट पॉईंट असतात. ज्याद्वारे तुम्ही मार्गांवर चढू शकता किंवा बाहेर पडू शकता.

एक्सप्रेस वे दोन ठिकाणांमधील किंवा शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी बांधले जातात.

हायवे
हायवे दोन गावांना किंवा दोन शहरांना जोडण्यासाठी बांधले जातात.

हायवे प्रामुख्याने दोन लेन किंवा चार लेनचे असतात.

हायवेवर जाण्यासाठी किंवा उतरण्यासाठी स्पेशल एन्ट्री किंवा एक्झिट पॉईंट नसतात.

हायवे वर टू व्हीलर वाहनांना देखील परवानगी असते. हायवेवर इतर कमी गतीचे वाहन देखील जाऊ शकतात.