डाळिंबाच्या रसामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते, जे आपली किडनी डिटॉक्स करण्यास मदत करते.
तुम्हालाही तुमची किडनी निरोगी ठेवायची असेल तर डाळिंबाचा रस नक्की प्या.
आल्यात नैसर्गिक उष्णता असते. पण त्याचा वापर करून आपण आपली किडनी नेहमी निरोगी ठेवू शकतो.
आल्यामुळे किडनी नेहमी स्वच्छ राहते आणि निरोगी राहते.
व्हिटॅमिन ए समृद्ध गाजर किडनी चांगल्या प्रकारे डिटॉक्स करतात.
हिरव्या पालेभाज्या, विशेषत: पालक, किडनीमध्ये साचलेले टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.
टोमॅटोमध्ये असलेले लाइकोपीन किडनी साफ करण्यास मदत करतात.
अँटिऑक्सिडेंट युक्त टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे किडनी निरोगी राहते.
नैसर्गिक पोषक तत्वांनी समृद्ध, कलिंगडमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते जे आपल्या मूत्रपिंडातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.
व्हिटॅमिन सी असलेल्या संत्र्याचा रस किडनीला आतून डिटॉक्स करण्यास खूप मदत करतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.