शाहरुख खानचा जवान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अभिनेत्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारानेही मुख्य भूमिका साकारली होती. खरं तर अभिनेत्रीच्या कारकिर्दीतील हा सर्वात हिट चित्रपट होता. मात्र जवानाच्या यशानंतरही नयनतारा ही खूश नाही टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, जवानच्या हिटचे सर्व श्रेय शाहरुखला देण्यात आले आहे. ही अभिनेत्री हिटलिस्टमधून वगळली गेली. त्यामुळे नयनतारा या यशाने खूश नसून नाराज असल्याच्या चर्चा आहे. यामुळेच तिला आता हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा नाही. आता या अभिनेत्रीचा अंतिम निर्णय काय याची उत्सुकता फॅन मंडळींना लागली आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नयनतारा लवकरच तामिळ चित्रपट इरावानमध्ये दिसणार आहे.