संपूर्ण जगाला सध्या नवीन वर्षाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतेय.

येत्या काही तासातच आपण 2023 ला निरोप देऊन नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत.

नवीन वर्ष हे अनेकनासाठी नवीन अशा आणि संधी घेऊन येते.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, सगळीकडे उत्सवाचे वातावरण असते.

पण, तुम्हाला माहितीय का भारताच्या शेजारील काही देश 1 जानेवारीला नवं वर्ष साजरे करत नाहीत.

जाणून घ्या कोणते आहेत हे देश.

सौदी अरेबिया आणि यूएईसह बहुतेक देश इस्लामिक कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरे करतात.

चीनमध्ये केवळ चंद्रावर आधारित कॅलेंडर मानले जाते.

थायलंड मध्ये 13 किंवा 14 एप्रिल रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते.

रशिया आणि युक्रेनमध्ये देखील 14 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते.