मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते.
हेमांगीच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात
हेमांगीनं नुकताच सोशल मीडियावर तिचा जुना फॅमिली फोटो शेअर केला आहे.
हेमांगीनं तिच्या फॅमिली फोटोला तिनं खास कॅप्शन देखील दिसं आहे
हेमांगीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हा आमचा Family photo! माझे आई, बाबा, भाऊ, बहीण आणि मी! पण तुम्हांला यात चारच माणसं दिसताएत ना! अंहं, मी धरून पाच आहेत! मी खरंच आहे या photo त.'
'मी या फोटोत नसण्याचं कारण विचारल्यावर माझ्या दादा-ताईने प्रथेप्रमाणे वरचीच टेप लावली! तेव्हा एवढं वाईट वाटलं होतं ना, माझी आई सांगते मी त्यादिवशी उपाशी राहीले होते! मग मी जेवावं म्हणून माझ्या आईने मला सांगितलं की, मी तिच्या पोटात होते! ' असंही हेमांगीनं या पोस्टमध्ये लिहिलं.
हेमांगीनं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
हेमांगी ही सध्या तिच्या जन्मवारी या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
हेमांगीच्या आगामी चित्रपट आणि मालिकांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.