अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करत असतात. सध्या बिग बी हे त्यांच्या एका जुन्या ट्वीटमुळे चर्चेत आहे. 2010 मध्ये बिग बींनी एक ट्वीट शेअर केले होते. ट्वीटमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिलं, 'इंग्रजी भाषेत 'ब्रा' एकवचनी आणि 'पँटी' अनेकवचनी का आहे?' अमिताभ बच्चन यांच्या या जुन्या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या ट्वीटला सध्या अनेक नेटकरी रिप्लाय देत आहेत. एका नेटकऱ्यानं अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटला रिप्लाय दिला, 'तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती' अमिताभ बच्चन यांना ट्विटरवर 48.5 मिलियन फॉलोवर्स आहेत. अमिताभ बच्चन हे ट्विटरवर विविध विषयांवर आधारित ट्वीट शेअर करतात. बिग बी यांचा 'प्रोजेक्ट के' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.