समंथा रुथ प्रभूने काही दिवसांपूर्वी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत असल्याची घोषणा केली होती. समंथा ही सध्या बाली येथे गेली आहे. समंथानं तिच्या बाली ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. समंथानं शेअर केलेल्या बाली ट्रीपच्या फोटोमध्ये हिरवळ आणि समुद्र दिसत आहे. समंथानं बाली येथील उलुवाटू या ठिकाणाला भेट दिली. समंथानं शेअर केलेल्या बाली ट्रीपच्या फोटोमध्ये ती ऑल व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली. समंथा ही तिची बाली ट्रीप एन्जोय करत आहे, असं या फोटोमध्ये दिसत आहे. समंथानं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. समंथा ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. समंथाचा चाहता वर्ग मोठा आहे.