देशभरात सध्या मिचॉन्ग चक्रीवादळाचा कहर (Cyclone Michaung) सुरु आहे. अनेक राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. चेन्नई, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सध्या मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरु आहे. पावसाचा तडाखा 5 डिसेंबरपर्यंत कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मिचॉन्ग चक्रीवादळ सध्या दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर आहे आणि ते उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले मिचॉन्ग चक्रीवादळ अधिक धोकादायक बनलं आहे. दक्षिण भारतात या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसताना दिसत आहे हवामान खात्याने आंध्र, तामिळनाडू, केरळ आणि ओडिशासाठी इशारा दिला आहे. समुद्र किनारी भागात प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.