दूध उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. आंघोळीनंतर चेहऱ्यावर आणि शरीरावर दूध लावून हलका मसाज करा. तुम्ही चेहरा दुधाने धुवूही शकता.
याशिवाय तुम्ही दुधापासून विविध प्रकारचे फेस पॅक बनवून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे तुमच्या त्वचेला खोलवर पोषण मिळेल आणि ती चमकदार बनेल.
दही हे त्वचा चमकदार बनवण्यासाठी फायदेशीर आहे. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळते, जे त्वचेला एक्सफोलिएट करते.
दही त्वचा टोन करण्यास आणि त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते. हिवाळ्यात त्वचेसाठी दही वापरणे उत्तम ठरेल.
हिवाळ्यात त्वचेसाठी मध खूप फायदेशीर आहे. याचा वापर केल्याने त्वचा कोरडी होणार नाही आणि मॉइश्चरायज होऊन आतून चमकणारी होईल.
आंघोळी आधी दह्यामध्ये थोडेसे मध मिसळून शरीरावर मालिश करा, यामुळे त्वचेतील आर्द्रता लॉक होऊन मॉइश्चरायज होईल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.