टी बॅग आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही फायदेशीर आहे. डोळ्यांची सूज, निस्तेज त्वचा किंवा कोंडा यासारख्या समस्यांवर टी बॅगचे फारच उपयुक्त आहे.टी बॅगच्या वापरामुळे तुमचे सौंदर्य तर वाढेलच, पण तुम्हाला महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सवर खर्चही करावा लागणार नाही.याचा वापर कसा करायचा ते जाणून घ्या.
डोळे सूजल्यास यापासून आराम मिळण्यासाठी तुम्ही टी बॅग वापरू शकता. वापरलेल्या टी बॅग फक्त थंड होण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. यानंतर, त्यांना 10-15 मिनिटे डोळ्यांवर ठेवा. यामुळे सूज कमी होते आणि थकवा दूर होईल.
निस्तेज त्वचेला ताजेतवाने करण्यासाठीही टी बॅग्ज खूप फायदेशीर आहेत. टी बॅग्जमध्ये असलेली चहा पावडर चेहऱ्यावर हलक्या हातामे मसाज करा. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळेल.
सनबर्नचा त्रास झाल्यास ग्रीन टी बॅग्ज उपयुक्त ठरतील. ग्रीन टी बॅग्ज फ्रीजमध्ये ठेवून थंड करा आणि सनबर्न झालेल्या भागावर लावा. यामुळे त्वचेची जळजळ कमी होऊन आराम मिळेल.
अनेक लोकांचे केस खूप कोरडे आणि रुक्ष होतात, अशा वेळी त्यांना चमकदार आणि मऊ करण्यासाठी टी बॅग्जचा वापर करा. टी बॅग्ज पाण्यात उकळून ते पाळी थंड करून शॅम्पूनंतर हे पाणी केस धुण्यासाठी वापरा. त्यामुळे केस चमकदार आणि मजबूत होतात.
चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही वापरलेली ग्रीन टी बॅग पिंपल्सवर लावा. हे अँटीबैक्टीरियल गुणधर्मांच्या मदतीने डाग कमी करण्यास मदत करते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.