अलिकडे वजन कमी करणे ही प्रत्येकाची समस्या बनली आहे. काही लोक वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफीचे सेवन करतात.
ब्लॅक कॉफीमध्ये काही मसाले टाकले तर ते वजन कमी करण्यात आणखी प्रभावी होते.
हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे वजन कमी करण्यास मदत करते तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवते. ब्लॅक कॉफीमध्ये चिमूटभर हळद पावडर टाकून प्या.
वजन कमी करण्यासाठीही आलं खूप फायदेशीर आहे. यातील दाहक-विरोधी गुणधर्म पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करतात. तुमच्या ब्लॅक कॉफीमध्ये ताजे किसलेले आले मिसळा आणि प्या.
दालचिनीमध्ये असलेले पोषक तत्व चयापचय गतिमान करण्यास मदत करते. त्यामुळे ब्लॅक कॉफीमध्ये चिमूटभर दालचिनी पावडर मिसळणे फायदेशीर ठरेल.
काळी मिरीमध्ये असणारे पायपिन, चरबी जाळण्यास मदत करते. कॉफीमध्ये थोडी काळी मिरी पावडर मिसळल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.
यापैकी तु्म्ही कोणताही एक मसाला ब्लॅक कॉफीमध्ये मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. दिवसातून 1-2 वेळा प्यायल्यास उत्तम ठरेल. या कॉफीमध्ये साखर आणि दूध वापरू नका.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.