टोमॅटोमध्ये अँटीऑक्साइडचे घटक असतात आणि हृदयाच्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर असते. यामुळे शरिरामधील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
डार्क चॉकलेटेमध्ये फ्लेव्होनॉइड्स घटक असतात. हे रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयासंबंधित आजार कमी होण्यास मदत करते.
नट्समध्ये हेल्दी फॅट्स असतात. जे शरीरामधील LDL कोलेस्टेरॉल कमी करते आणि HLD कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
बेरीमध्ये अँटीऑक्साडचे घटक असतात, जे पोटामधील जळजळ कमी करतात. याशिवाय रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर ठरते.
ॲव्होकॅडोमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते, जे पोटामधील जळजळ कमी करुन रक्तप्रवाह नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
पालेभाज्यामध्ये अधिक प्रमाणात पोटॅशिअम असते. शरीराच्या अनेक रोगापासून बचाव करत असते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खाणे हे खूप फायदेशीर असते.
ओमेगा - 3 हे फॅटी ऍसिड्सने समृद्ध आहे. रक्तदाबच्या समस्या कमी करतात आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.